अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती; नाट्यविश्वात करणार पदार्पण

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमृताने ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ या नृत्य-संगीतात नाट्यपदार्पण केले आहे. भव्य नाट्यकृतीविषयी पोस्ट शेअर करत अमृताने तिच्या या नव्या प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. तिचे हे दीर्घकाळाचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, ‘वर्ल्ड ऑफ स्त्री ‘ मध्ये अमृता सोबत डान्स गुरु आशिष पाटील करणार आहे. 10 अफलातून नर्तकांची प्रतिभावान टीम त्यांच्यासोबत असणार आहे. 90 मिनिटांचा लाइव्ह ऑडिओ-व्हिज्युअल परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यात येणार आहे. भक्ती, श्रृंगार आणि शिवशक्तीच्या थीम्सनुसार हे सादरीकरण असणार आहे. एक नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून अमृताची खास ओळख आहे, पण तिच्या नृत्याविष्काराची अनोखी बाजू ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’मधून अनुभवयाला मिळणार आहे.
‘वर्ल्ड ऑफ स्त्री ‘चा टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमधून या कार्यक्रमाची एक सुंदर झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अर्थ एनजीओ आणि आशिष पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतकला स्टुडिओज निर्मित ‘वर्ल्ड ऑफ स्त्रीचा प्रीमियर 24 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे.
View this post on Instagram
‘वर्ल्ड ऑफ स्त्री’बद्दल अमृताने प्रतिक्रिया दिली की, ‘नृत्य हा कायमचं माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. “वर्ल्ड ऑफ स्त्री”च्या निमित्तानं नाट्य, नृत्य आणि संगीत यांची अनोखी सांगड घालून ही एक मैफिल प्रेक्षकांना देणं हे माझ्यासाठी स्वप्न होत आणि ते पूर्ण होतंय! आशिष पाटील अर्थ एनजीओ यांच्यासोबत सहकार्य करून आणि कथ्थक नर्तकांची एक अत्यंत कुशल टीम सोबत घेऊन हा नवा प्रवास सुरू करणं माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.’
View this post on Instagram
दरम्यान, अमृतासह तिच्या टीमने या नव्या प्रोजेक्टची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सुरु केली आहे. अभिनेत्रीने सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचा:





