अमृता खानविलकर आणि स्नेहा वाघ पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात दिसणार एकत्र

Amruta Khanwilkar and Sneha Wagh | अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच एका हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत स्नेहा वाघ देखील असणार आहे. दोघीही पहिल्यांदाच एकत्र ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. परेश रावलसोबत दोघी काम करताना दिसणार आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, प्रिया बापट, गिरिजा ओक यांच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता अभिनेत्री स्नेहा वाघने देखील बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये एंट्री केली आहे. तुषार अमरीश गोयल दिग्दर्शित, हा बहुप्रतिक्षित चित्रपट ताजमहाल आणि आग्रा येथील आसपासच्या ठिकाणी शूट करण्यात आला आहे.
तसेच देहरादून आणि उत्तराखंडमध्ये चित्रित केलेल्या मुख्य दृश्यांसह भारताच्या ऐतिहासिक स्थळांचे वैभव दाखवले जाणार आहे. निर्माते सीए सुरेश झा, लेखक-दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसर विकास राधेशाम यांच्यासह चित्रपटाच्या क्रूने ४५ दिवसांचे शूट पूर्ण केले आहे. Amruta Khanwilkar and Sneha Wagh |
परेश रावल, अमृता खानविलकर आणि स्नेहा वाघ यांच्यासोबत द ताज स्टोरीमध्ये अभिनेते अखिलेंद्र मिश्रा, बिजेंद्र काला, शिशिर शर्मा, श्रीकांत वर्मा आणि अभिजीत लेहरी यांचाही समावेश आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. Amruta Khanwilkar and Sneha Wagh |
अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं अनेक मराठीसह हिंदी सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तर स्नेहाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात देखील पाहायला मिळाली होती.





