Amruta Fadnavis: “मी ॲक्सिस बँकेत कार्यरत असताना…”; नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’वर अमृता फडणविसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis : नाशिकचे प्रकरण दु:खदायक असल्याचे सांगत ॲक्सिस बँकेत कार्यरत असताना माझ्यासमोरही अशी प्रकरणे झाल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.

Amruta Fadnavis: नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरणाचा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सध्या सातत्याने वेगवेगळी नावे समोर येत आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकचे प्रकरण दु:खदायक असल्याचे सांगत ॲक्सिस बँकेत कार्यरत असताना माझ्यासमोरही अशी काही प्रकरणे झाल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. Amruta Fadnavis
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात ॲक्सिस बँकेत झालेल्या घटनेचा संदर्भ देत सांगितले की, “जेव्हा मी ॲक्सिस बँकेत काम करत होते, तेव्हा माझ्यासमोरही धर्मांतरणाची प्रकरणे झाली होती. माझ्यासमोरही अशाच प्रकारच्या केसेस आल्या होत्या. परंतु तत्कालिन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर त्वरित कारवाई केली होती. आताही अशाच प्रकारच्या कारवाईची गरज आहे.” Amruta Fadnavis
आजकाल लव्ह जिहादची प्रकरणे खूपच भयानक आहेत. त्याविरोधात आता कारवाई होत आहे. पण आपल्या मुलींनीही थोडे जागरूक असले पाहिजे. आपली संस्कृती आपण फॉलो केली पाहिजे, ती जपली पाहिजे. आपण आपल्या संस्कृती अनुकरण केले तर अशा गोष्टी टाळता येतील. यात पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. मुलींचे शिक्षण, भारतीय मूल्य व्यवस्था यावर लक्ष केंद्रित करायला हवे,” असेही त्या म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांंनी वाढत्या लव्ह जिहादच्या आरोपांचा उल्लेख केला आणि यावर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. “अशा घटना टाळण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. कार्यालयात महिलांसोबत असे जर घडत असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगणे आवश्यक आहे. त्यातून निश्चित पुढील घटना टाळता येऊ शकतात,” असे त्या म्हणाल्या.
तर अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “हे भयानक प्रकरण आहे. खरातने जी काही आपली बुद्धी आणि ऑरा तयार केला त्याचा उपयोग या गोष्टींसाठी केला याचा खूप खेद आहे. स्त्रियादेखील त्याच्या बळी पडल्या याचं दु:ख वाटतंय. या प्रकरणात कडक कारवाई सुरु आहे. खरातला कडक शिक्षा व्हावी, अशी प्रत्येक स्त्रिची विनंती आहे.” दरम्यान, सध्या या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा:






