Amrita Rao: “माझ्यावर वशीकरण झालं, तीन मोठ्या फिल्म्स बंद पडल्या”: ‘इंडस्ट्रीमध्ये काळी जादू होते’ अभिनेत्रीचा दावा!

Amrita Rao : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हिने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की तिच्यावर कुणीतरी काळी जादू केली होती आणि त्यानंतर तिच्या तीन मोठ्या चित्रपटांचं काम अचानक थांबलं.
पॉडकास्टमधील खुलासा
‘विवाह’ आणि ‘जॉली एलएलबी 3’ सारख्या चित्रपटांत झळकलेली अमृता राव, रणवीर अल्लाहबादिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या मुलाखतीत रणवीरने तिला “इंडस्ट्रीमध्ये काळी जादू खरंच असतं का?” असा प्रश्न विचारला. त्यावर अमृता थोडी चकित झाली आणि म्हणाली,
“तुम्ही असं का विचारत आहात?”
त्यावर रणवीर म्हणाला की, “जे लोक साधे आणि स्वच्छ मनाचे असतात, त्यांना अशा नकारात्मक ऊर्जांचा जास्त परिणाम होतो.”
गुरुजींचा इशारा
अमृताने पुढे सांगितलं की, एकदा ती आपल्या गुरुजींना भेटायला गेली होती. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, पण दोन दिवसांनी तिच्या आईला सांगितलं की,
“तुमच्या मुलीवर कुणीतरी काळी जादू केली आहे, तिच्यावर वशीकरण केलं गेलं आहे.”
हे ऐकून अमृता थक्क झाली. ती म्हणाली,
“मी कधीच वशीकरणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता. पण हे जर कुणी दुसरं सांगितलं असतं तर मी हसून टाकलं असतं. मात्र माझे गुरुजी अत्यंत प्रामाणिक आहेत, त्यांना काही मिळवायचं नाही किंवा गमवायचं नाही. म्हणून त्यांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष करू शकले नाही.”
तीन मोठ्या चित्रपटांचा अंत
अमृता रावने सांगितलं की त्या काळात तीन मोठ्या बॅनरच्या चित्रपटांसाठी तिने करार केले होते.
“मी त्या चित्रपटांसाठी साइनिंग अमाऊंटदेखील घेतलं होतं, पण आश्चर्य म्हणजे ती तिन्ही चित्रपटं बनलीच नाहीत! शेवटी मला घेतलेले पैसे परत करावे लागले.”
ती पुढे म्हणाली की, “मी आधी फक्त ऐकलं होतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काळं जादू होते, पण स्वतःच्या आयुष्यात असं काही घडेल असं कधी वाटलंच नव्हतं.”





