CSK Complaint Letter : सीएसकेने खरंच जादूटोण्याची तक्रार केली? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ पत्रामागचं धक्कादायक सत्य उघड
CSK Complaint Letter : या घटनेनंतर सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्सच्या लेटरहेडसारखे दिसणारे एक पत्र व्हायरल झाले.

CSK Fake Complaint Letter Black Magic : आयपीएल २०२६ च्या हंगामात मैदानातील थरारासोबतच सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांविरुद्ध बीसीसीआयकडे ‘ब्लॅक मॅजिक’ (करणी-बाधा) केल्याची तक्रार केल्याचे एक पत्र व्हायरल झाले आहे. ते खरे आहे की खोटे जाणून घेऊया.
नेमंक प्रकरण काय?
१८ एप्रिल २०२६ रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान एका हैदराबादच्या चाहत्याने स्टँड्समध्ये बसून हातात लिंबू घेऊन जादूटोण्यासारखी कृती केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. योगायोगाने, हा ‘तोडगा’ केल्याच्या काही क्षणातच चेन्नईचा सेट फलंदाज शिवम दुबे (२१ धावा) बाद झाला. या टायमिंगमुळे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आणि चाहत्यांनी मजेशीरपणे याला ‘जादू’ ठरवले.
Black magic live 😭 pic.twitter.com/rzJYd6kjti
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) April 19, 2026
फेक पत्राने उडवली खळबळ –
BIG BREAKING 🚨
A SRH fan did Black Magic on CSK and then CSK Fans filed a Complaint to BCCI 🤯 pic.twitter.com/uUdKAO4KdV
— Nafees (@Nafees_22) April 19, 2026
या घटनेनंतर सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्सच्या लेटरहेडसारखे दिसणारे एक पत्र व्हायरल झाले. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, “हैदराबादच्या चाहत्यांनी केलेल्या जादूटोण्यामुळे आमचा संघ हरला असून बीसीसीआयने यावर कारवाई करावी.” अनेक क्रिकेट चाहत्यांनी हे पत्र खरे मानून शेअर करायला सुरुवात केली.
सत्य काय आहे?
तेलंगणा सरकारचे अपडेट्स देणाऱ्या @TGGovtUpdates या अधिकृत हँडलसह अनेक फॅक्ट-चेकर्सनी या पत्राचे खंडन केले आहे. हे पत्र ‘फोटोशॉप’ करून केवळ खोडसाळपणा आणि मजेसाठी तयार करण्यात आले होते. बीसीसीआय, सीएसके किंवा एसआरएच मॅनेजमेंटने अशा कोणत्याही ‘जादूटोणा’ विषयावर अधिकृत तक्रार केलेली नाही.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सीएसकेने आरसीबीच्या एका डीजे विरुद्ध (इडली-डोसा गाण्यावरून) खरी तक्रार केली होती, त्यामुळे चाहत्यांना हे बनावट पत्र देखील खरे वाटले. मात्र, आता हे सिद्ध झाले आहे की, तो केवळ आयपीएलमधील चाहत्यांमधील एक खोडकर संवाद (Banter) होता.





