अमोल कोल्हेंचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; ‘अरुंधती’सोबत झळकणार मुख्यभूमिकेत

Mi Savitribai Jotirao Phule | ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले‘ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती असणाऱ्या या मालिकेचा पहिला प्रोमो 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. यात स्वत: अमोल कोल्हे या मालिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारत असून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर सावित्रीबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील तिच्या ‘अरुंधती’ या पात्राला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यानंतर आता ती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरचा कार्यक्रमाच्या लॉन्च सोहळ्यातील काही खास व्हिडिओ समोर आले आहेत. स्वत:च्या मालिकेचा प्रोमो पाहताना ती भावुक झाली होती. शिवाय या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली की, ‘आज पहिल्यांदा प्रोमो पाहिला. त्यामुळे मी आताही थरथर कापतेय. सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनी, सतीश (सतीश राजवाडे) आणि संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशन्सचे मी मनापासून आभार मानते की, एवढी आभाळाएवढी मोठी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं. भरुन आलंय, दडपणही आहे, हुरहुर वाटतेय, उत्सुकता-जबाबदारी आहे. ‘ Mi Savitribai Jotirao Phule |
View this post on Instagram
दरम्यान, केवळ मधुराणीच नव्हे तर डॉ. अमोल कोल्हेदेखील पुनरागमन करत आहेत. ते याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत झळकले होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकारणावरच लक्ष केंद्रित केले. या मालिकेच्या निमित्ताने ते अभिनयासह निर्मात्याची जबाबदारीही निभावताना दिसणार आहेत. Mi Savitribai Jotirao Phule |
या मालिकेद्वारे डॉ. अमोल कोल्हे यांनी खूप वर्षांनंतर टिव्हीवर जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यामुळे चाहते त्यांना पाहायला खूपच उत्सुक आहेत. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनाचा संघर्ष जवळून पाहायला मिळणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका पुढच्या वर्षी 5 जानेवारी 2026 पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अद्याप मालिकेची वेळ जाहीर केली नाही. Mi Savitribai Jotirao Phule |
हेही वाचा:
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; कोणी घेतला निर्णय? कारण काय?





