Ashok Saraf । Navara Maza Navsacha । Navara Maza Navsacha 2 : अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासह त्यातील गाणी देखील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग देखील पूर्ण झालं असल्याचं स्वतः अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सांगितलं आहे.
लवकरच ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर यांनीच केलं आहे. या सिनेमातील अभिनेते अशोक सराफ यांनी ‘लालू कंडक्टर’ची भूमिका साकारली होती. अशोक सराफ यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्याही भलतीच पसंतीस उतरली होती.
मात्र, आता ‘नवरा माझा नवसाचा 2’मध्ये लालू कंडक्टर दिसणार नाहीये. कारण अशोक सराफ हे कंडक्टर नव्हे तर टीसी च्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच या सिनेमातील त्यांचा पहिला लूक प्रदर्शित केला असून, यामध्ये अशोक सराफ हे टीसी बनले असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, अभिनेते सुनील तावडे यात दिसणार का? याबाबत अद्याप कोणतीच अपडेट समोर आलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर आणि सोनू निगम हे कलाकार झळकले होते. आता तब्बल 20 वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून, 20 सप्टेंबर 2024 या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. स्वतः सचिन पिळगावकर यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.