Naigaon : चिमुकल्यांना अमोल कामठे यांची मदत
Naigaon : केवळ आर्थिक मदत देऊन न थांबता, या दोन्ही बालकांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि भविष्यातील वाटचालीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही अमोल कामठे यांनी दिली. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या निरागस बालकांच्या आयुष्यात मदतीचा हात देत अमोल कामठे यांनी माणुसकीचे नाते जपले आहे.

नायगाव : नियतीच्या एका क्रूर घावाने अवघ्या सहा आणि दहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांच्या आयुष्यातील आई-वडिलांचे प्रेमळ छत्र कायमचे हरपले. पुरंदर तालुक्यातील नाझरे, कडे पठार (खैरे वस्ती) येथील महेंद्र पोपट नाझीरकर (वय ३५) आणि त्यांच्या पत्नी रेश्मा महेंद्र नाझीरकर (वय ३२) यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वयाच्या कोवळ्या टप्प्यावरच आई-वडिलांचा आधार हरपल्याने या दोन्ही बालकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या दुःखद प्रसंगाची सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या भावनेतून पुरंदर-हवेलीचे युवा नेते तथा श्री विठाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अमोल दत्तात्रय कामठे यांनी नाझीरकर कुटुंबीयांची भेट घेतली. या दोन्ही चिमुकल्यांच्या संगोपनासाठी आणि कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
केवळ आर्थिक मदत देऊन न थांबता, या दोन्ही बालकांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि भविष्यातील वाटचालीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही अमोल कामठे यांनी दिली. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या निरागस बालकांच्या आयुष्यात मदतीचा हात देत अमोल कामठे यांनी माणुसकीचे नाते जपले आहे. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना या मदतीतून व्यक्त होत आहे. त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.





