मुंबई- अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी 2,238 झाडे अखेर कापण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वच स्तरातून विरोध दर्शवला जात आहे. दरम्यान, बॉलिवूडचे माहानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, अप्रत्यक्षपणे मुंबई मेट्रोला पाठिंबा दिला आहे.
मात्र, बच्चन यांच्या या पोस्ट नंतर आरे समर्थकांनी जलसा बंगल्याबाहेर निदर्शने करत ‘आरे वाचवा’च्या घोषणा दिल्या आहेत. बच्चन यांनी प्रदूषणावर उपाय म्हणून घराच्या बागेत झाडं लावण्याचा सल्ला दिला होता. यावर आरे समर्थकांनी ‘बाग आणि जंगल यातील फरक लक्षात घ्या, बगीचे जंगलाची जागा घेऊ शकत नाही.’ असे संदेश लिहलेले फलक हातात घेत त्यांच्या ट्विटचा विरोध केला आहे.
T 3290 – Friend of mine had a medical emergency, decided to take METRO instead of his car .. came back very impressed .. said was faster, convenient and most efficient .. ?
Solution for Pollution ..
Grow more trees .. I did in my garden .. have you ❤️— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 17, 2019