‘ऑपरेशन महादेव’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठा पुरावा जप्त ; केंद्रीय गृहमंत्री काय म्हणाले ? वाचा

Amit Shah On Opration Sindhoor । भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पॅरा कमांडोंनी जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या बाहेरील जंगलात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना ठार मारले. या कारवाईत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. या प्रकरणाशी संबधीत समोर आलेल्या माहितीनुसार , दाचिगाममध्ये मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमधून भारताला पहलगाम हल्ल्यात या दहशतवादी सहभागी असल्याचा ठोस पुरावा मिळाला आहे. याविषयी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत माहिती दिली.
ऑपरेशन सिंदुरवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी काही सवाल केले होते. त्यात हे दहशतवादी पाकिस्तानचे होते याचा पुरावा काय असा थेट सवाल सरकारला केला होता. त्याचेच उत्तर देताना आज अमित शाह यांनी, “रात्री उशिरा ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त केलेली शस्त्रे चंदीगडमधील सीएफएसएलला पाठवण्यात आली. फॉरेन्सिक तपासणीत, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सापडलेल्या गोळ्यांच्या कवचांशी ही शस्त्रे जुळली आहेत . तसेच मारल्या गेलेल्या ३ पैकी २ दहशतवाद्यांजवळ जे चॉकलेट्स मिळाले आहेत ते देखील पाकिस्तनामध्ये बनवण्यात येत असल्याचे सांगत विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर दिले. समोर आलेल्या माहितीनुसार,”तिन्ही शस्त्रांचा फॉरेन्सिक अहवाल पहलगाममध्ये सापडलेल्या गोळ्या आणि गोळ्यांच्या कवचांशी जुळत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Amit Shah confirms in Parliament killing of terrorists involved in Pahalgam terror attack
Read @ANI Story | https://t.co/tlRG2K36sH#AmitShah #PahalgamTerrorAttack #Parliament pic.twitter.com/XxEeoCDg3Q
— ANI Digital (@ani_digital) July 29, 2025
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड Amit Shah On Opration Sindhoor ।
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मानला जाणारा सुलेमान उर्फ आसिफ सोमवारी (२८ जुलै २०२५) तांत्रिक संकेत मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईत मारला गेला. ते म्हणाले की, हे तांत्रिक संकेत पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांनी वापरलेल्या सॅटेलाइट फोनच्या वापराकडे निर्देश करत होते.
इतर ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली Amit Shah On Opration Sindhoor ।
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराच्या कारवाईत मारले गेलेले इतर दहशतवाद्यांची ओळख जिब्रान (गेल्या वर्षी सोनमर्ग बोगद्याच्या हल्ल्यात सहभागी असलेला) आणि हमजा अफगाणी अशी झाली आहे. या ऑपरेशनचे सांकेतिक नाव ऑपरेशन महादेव होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ जणांची गोळ्या घालून हत्या केली होती. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. यानंतर, सशस्त्र दलांनी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा दाचिगाम ऑपरेशनमध्ये मृत्यू होणे हे एक मोठे धोरणात्मक यश मानले जात आहे.





