‘तुम्ही पाकिस्तानशी बोलता का…?’ ; अखिलेश यादवने टोकल्यानंतर अमित शहांचे जोरदार प्रत्युत्तर, पहा व्हिडिओ

Amit Shah on Akhilesh Yadav। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना , “पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांना मारणारे तीन दहशतवादी काल ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मारले गेले” असे सांगितले. त्यांनी सभागृहाला सांगितले की, “या उद्देशाने सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे आणि अनेक पातळ्यांवर दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे.”
अखिलेश आणि अमित शहा यांच्यात वादविवाद
अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना, “दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी एका महिन्याहून अधिक काळ शोध मोहीम राबवण्यात आली, त्यानंतर २२ जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाली. सोमवारी झालेल्या कारवाईत सुलेमान, अफजान आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. चकमकीनंतर, दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या रायफल्सच्या काडतुसांच्या एफएसएल अहवालातून आणि त्यांना मदत करणाऱ्या, ज्यांना आधीच अटक करण्यात आली होती, त्यांची ओळख पटवण्यात आली.” अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
लोकसभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी, “ऑपरेशन सिंदूर सुरू करून पंतप्रधान मोदींनी पहलगाममध्ये दहशतवादी पाठवणाऱ्यांच्या मालकांचा नाश केला. आता लष्कराने ऑपरेशन महादेव अंतर्गत त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.” असे त्यांनी म्हटले. यावर सपा खासदार अखिलेश यादव यांनी गृहमंत्र्यांना, “मालक पाकिस्तान आहे”, असे म्हटले. त्यावर लगेच अमित शहा यांनी उत्तर दिले की, तुम्ही पाकिस्तानशी बोलता का?
VIDEO | Parliament Monsoon Session: Union Home Minister Amit Shah (@AmitShah) responds to Samajwadi Party MP Akhilesh Yadav’s remark during debate on Operation Sindoor, says, “I was expecting that the opposition will be happy to hear that Pahalgam attack perpetrators have been… pic.twitter.com/i8m7sTrSj5
— Press Trust of India (@PTI_News) July 29, 2025
‘दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका’ Amit Shah on Akhilesh Yadav।
यानंतर लोकसभेत गोंधळ सुरू झाला आणि सर्व सपा खासदार आपापल्या जागेवरून उभे राहिले. पण सभापती ओम बिर्ला यांनी अमित शहांना त्यांचे विधान पूर्ण करण्यास सांगितले. यानंतर अमित शहा पुढे म्हणाले की, “दहशतवाद्यांच्या खात्माची माहिती मिळाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांमध्ये आनंदाची लाट पसरेल अशी मला आशा होती. पण विरोधी खासदारांवर शाईचा वर्षाव झाला. दहशतवादी मारले गेले तरी ते आनंदी नाहीत. यानंतर, पुन्हा एकदा अखिलेश यादव यांनी अमित शहांना त्यांच्या भाषणात मध्येच अडवले, त्यानंतर गृहमंत्र्यांनी सांगितले की,” अखिलेश जी, दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दुःखी होऊ नये”. तसेच, “सहा शास्त्रज्ञांनी या अहवालाची पुष्टी केली आहे आणि मला सांगितले आहे की हे १०० टक्के पहलगाममध्ये डागण्यात आलेल्या गोळ्यांसारखेच आहेत.” असे सांगितले.
तुमच्या सरकारच्या काळात किती दहशतवादी पळून गेले? Amit Shah on Akhilesh Yadav।
अमित शहा यांनी सभागृहात सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर मी तिथे गेलो होतो आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेटलो होतो. ज्या मुलीचे लग्न होऊन सहा दिवस झाले होते ती तिथे विधवा म्हणून उभी होती, मी माझ्या आयुष्यातला तो दृश्य कधीही विसरू शकत नाही. पण आज मी त्यांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी पाठवणाऱ्यांना मारले आणि आपल्या सुरक्षा दलांनी त्या दहशतवाद्यांनाही मारले. त्याने असा धडा शिकवला आहे की येणाऱ्या अनेक दिवसांत कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करू शकणार नाही.
विरोधकांच्या प्रश्नांवर अमित शहा म्हणाले की, पहलगामचे दहशतवादी कुठून आले आणि ते कसे पळून गेले, असा प्रश्न वारंवार विचारला जातो, म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही सरकारमध्ये आहोत, जबाबदारी आमची आहे. पण त्याच वेळी मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही सरकारमध्ये असताना जबाबदारी का घेतली नाही? यानंतर अमित शहा यांनी काँग्रेस सरकारच्या काळात देश सोडून पळून गेलेल्या दाऊद इब्राहिम, सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन अशा अनेक दहशतवाद्यांची नावे घेतली आणि म्हणाले की पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना आमच्या सैन्याने मारले, तुम्ही काय केले?





