नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भाजपच्या गटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्या (मंगळवारी) दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच, अमित शहांकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांना मंगळवारी दिल्लीत भोजनाचे सुध्दा निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, विरोधकांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून सर्वजण २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत.
Sources: Union Council of Ministers likely to meet tomorrow; BJP President Amit Shah to host a dinner for NDA leaders tomorrow pic.twitter.com/kyPAHAf3U2
— ANI (@ANI) May 20, 2019