मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या मंत्र्यांचे अमित शहांनी मागवले रिपोर्ट कार्ड ; ‘या’ अटी पूर्ण करणाऱ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

Amit Shah । राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार का असा प्रश्न सर्वांच पडला आहे. येत्या 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. परंतु अजूनही मुख्यमंत्रिपदासाठी कोणत्याही नेत्याच्या नावाची घोषणा महायुतीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे हा पेच अजून तरी सुटला नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात येणार आहे त्यांचे सर्वांचे रिपोर्ट कार्ड केंद्रीय नेतृत्वाने मागवले असल्याची बातमी समोर आली आहे.
अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का?, या सर्वांचा लेखाजोखा या रिपोर्टकार्डमध्ये मागवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अटींची पूर्तता करणं अपेक्षित Amit Shah ।
मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोबत त्या – त्या पक्षांच्या नेत्यांचे रिपोर्टकार्ड देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गृहमंत्री अन् उपमुख्यमंत्रीपदाचा आज फैसला Amit Shah ।
उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत. मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.





