Amit Mishra Allegations : ‘…त्यानंतर विराटने माझा फोन उचलणं बंद केलं’, अमित मिश्राचे कोहलीवर गंभीर आरोप; कुंबळेबद्दलही केला खुलासा
Amit Mishra Allegations : भारताचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर एक गंभीर आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, कोहलीने त्याला तंदुरुस्त झाल्यावर संघात परतण्याचे आश्वासन दिले होते, पण तसे झाले नाही.

Amit Mishra Explosive Allegations Against Virat Kohli and Anil Kumble on Team India Career : भारताचा माजी लेग-स्पिनर अमित मिश्रा याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट अत्यंत अनपेक्षित आणि वेदनादायी पद्धतीने झाला. २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध बंगळुरू येथे खेळलेला टी-२० सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. या सामन्यानंतर दुखापतीमुळे बाहेर पडलेला मिश्रा पुन्हा कधीही भारतीय संघात पुनरागमन करू शकला नाही. तब्बल एका दशकानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अमित मिश्राने तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक वर्षांचा मौन अखेर सोडला आहे.
बंगळुरूमधील दुखापत अन् प्रशिक्षक अनिल कुंबले यांचे आश्वासन –
पॉडकास्टमध्ये आठवणींना उजाळा देताना अमित मिश्रा म्हणाला की, २०१७ च्या त्या सामन्यादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. मैदानातून बाहेर पडताना संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले होते. मिश्राने कुंबळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी, “काळजी करू नकोस, तू पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) होताच संघात तुझे पुनरागमन होईल,” असा थेट शब्द दिला होता. मात्र प्रशिक्षकांचे हे आश्वासन केवळ हवेतच विरले आणि बंगळुरूचा तो सामना मिश्राचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
‘फिट हो, संघात परत येशील’; विराटने दिला होता शब्द –
Why i don’t agree Akash Chopra, Raigbait Podcaster 😠
⨀ It you’re taking Amit Mishra podcast, Why to drag Virat Kohli name? For views
⨀ So was Virat Kohli only responsible for Amit Mishra downfall?
⨀ Amit Mishra is so much senior to Virat then ask him to show some dignity towards Kohli rather spreading fake agendas.
⨀ From this point and logic, Irfan Pathan, Yusuf Pathan, Yuvraj Singh, Dinesh Karthik and many more should blame always to MS Dhoni who is 3 ICC trophy winner champion. 😦Stop this , Akash Chopra 😠 https://t.co/txMLj1Ep8H
— Cricket Virus (@Cricketvirus18) October 22, 2026
कुंबळे यांच्यानंतर विराट कोहली पूर्णवेळ कर्णधार बनला. मिश्राने विराटशी संपर्क साधून संघात परतण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली होती. त्यावर विराटनेही, “भावा, काळजी करू नकोस. तू पूर्णपणे तंदुरुस्त आणि कम्फर्टेबल हो, तू थेट संघात असशील,” असा विश्वास दिला होता. कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांकडूनही हिरवा कंदील मिळाल्यामुळे मिश्राने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कठोर मेहनत घेऊन दुखापतीवर यशस्वी मात केली.
आठवडे उलटले तरी उत्तर नाही; विराटने फोन उचलणे केले बंद –
🚨 MASSIVE STATEMENT BY AMIT MISHRA ON VIRAT KOHLI 🚨
Interviewer 🗣️: You saw changes in Virat Kohli? As a person?
Amit Mishra 🗣️: Yes, I have seen a lot of changes!!!
Interviewer 🗣️: Not many conversations with you?
Amit Mishra 🗣️: Yes, like 0 conversations.
Interviewer 🗣️: Do you think the captaincy and the power is the reason behind his changes?
Amit Mishra 🗣️: Definitely, the fame, the power was there 100%.
Interviewer 🗣️: Once we had a podcast with Yuvraj Singh, we asked him about him dancing in Virat’s wedding. He said,
“Virat was my friend, but my friendship was with Cheeku. Now he is too Virat!!”Amit Mishra 🗣️: Yuvraj Singh met Cheeku when he entered the Indian team. I know Cheeku when he was 14 years old, the Cheeku who used to eat samosas, pizza!! So that Cheeku and the Virat Kohli captain have hell and heaven difference!!
A person should not CHANGE.
— lndian Sports Network (@IS_Netwrk29) February 12, 2026
दुखापतीतून सावरल्यानंतर जेव्हा मिश्राने विराट कोहलीशी संपर्क साधला, तेव्हा विराटने आठ ते दहा दिवसांत कळवतो असे सांगितले. मात्र आठवडा, दोन आठवडे आणि तीन आठवडे उलटून गेले तरी कर्णधाराकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. मिश्राने सांगितले, “मी विराटला फोन केला, पण त्याने उचलला नाही. मी मेसेज केले, पण त्याचेही उत्तर आले नाही. मी पुन्हा दोन-तीन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण समोरून काहीच हालचाल झाली नाही. जेव्हा तुम्हाला संघात कोणी नको असते, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही.”
इतर खेळाडूंना थेट संधी, मला मात्र साधे उत्तरही नाही: मिश्राची खंत
सध्या दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या अमित मिश्राने तीव्र नाराजी व्यक्त केली की, “माझ्यापेक्षा अधिक गंभीर दुखापत झालेले आणि दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिलेले अनेक खेळाडू थेट भारतीय संघात परतले. मात्र माझ्या बाबतीत असे घडले नाही आणि मला संघातून का वगळले, याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही.” मिश्राच्या या खळबळजनक खुलाशामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा जुन्या वादांना तोंड फुटले आहे.





