Vaibhav Sooryavanshi Hype : ‘वैभवभोवतीची अतिरिक्त चर्चा त्याच्यासाठी आणि संघासाठी घातक’, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटका यांचे रोखठोक मत
Vaibhav Sooryavanshi Hype : फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी म्हटले आहे की, वैभव सूर्यवंशी एक उत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु त्याच्याभोवती निर्माण झालेली प्रसिद्धी त्याच्यासाठी किंवा संघासाठी चांगली नाही.

Sitanshu Kotak on Vaibhav Sooryavanshi Hype Ahead of 2nd T20I vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इशान किशनच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाल्याने, शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याला संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी वैभवच्या सहभागाबाबत आनंद व्यक्त केला असला, तरी त्याच्याभोवती सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात सुरू असलेल्या अति-चर्चेवर (हाइप) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही अतिरिक्त हवा खेळाडूच्या विकासासाठी आणि संघातील इतर खेळाडूंसाठी अजिबात हिताची नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
सोशल मीडियावरील दबावामुळे प्लेइंग इलेव्हन बदलू शकत नाही –
दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना सितांशु कोटक म्हणाले की, वैभवचे वय अत्यंत लहान असले तरी संघ व्यवस्थापन त्याची पूर्ण काळजी घेत आहे. ते म्हणाले, “वैभव एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू असून प्रत्येकाला तो आवडतो. सोशल मीडियावर आणि संघातही त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे; मात्र केवळ लोक त्याला पसंती देतात म्हणून तुम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये फेरबदल करू शकत नाही. तो अजून केवळ १५-१६ वर्षांचा मुलगा आहे. सुरुवातीपासून त्याला खेळवलेच पाहिजे, अशी चर्चा निर्माण करणे स्वतः त्या खेळाडूसाठी योग्य नाही आणि जे सलामीवीर आधीच चांगली कामगिरी करत आहेत, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करणेही अन्यायकारक आहे.”
वैभव समजूतदार; संजू आणि अभिषेकच्या कामगिरीचा आदर –
Could the young sensation get his chance? 👀
Batting coach Sitanshu Kotak speaks about Vaibhav Sooryavanshi as India assess their options amid Ishan Kishan’s injury.
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand, 2nd T20I, TOMORROW 11:30 AM onwards LIVE on Sony Sports Network TV channels, Sony LIV & Sony Vizha.
#SonySportsNetwork #SonyLIV #SonyVizha #NZVIND
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) October 23, 2026
भारतीय संघाने संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या आघाडीच्या तीन फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. कोटक यांच्या मते, वैभव आता अत्यंत समजूतदार झाला आहे. संजू किंवा अभिषेक सातत्याने धावा करत असताना त्यांना संघातून वगळले जाऊ शकत नाही, हे सत्य त्याने स्वीकारले आहे. “तो खेळण्यासाठी उत्सुक असणे स्वाभाविक आहे, कारण त्याच्या जागी कोणीही असते तरी खेळण्याचीच इच्छा बाळगली असती. परंतु तो अत्यंत साधा मुलगा असून त्याने कधीही कोणतीही तक्रार केलेली नाही. ड्रेसिंग रूममधील दररोजचा अनुभव त्याला परिपक्व बनवत आहे.”
चेंडूचा विचार न करता फटकेबाजी; वैभवची आक्रमक शैली –
वैभवच्या फलंदाजी तंत्रावर भाष्य करताना कोटक म्हणाले की, चेंडू स्विंग किंवा सीम होत असताना कोणते फटके खेळायचे यावर त्यांच्यात नियमित चर्चा होते. “काही फलंदाज चेंडूच्या गुणवत्तेनुसार (मेरिट) शॉट निवडतात, तर काही फलंदाज चेंडू कसाही आला तरी आपला शॉट आधीच निश्चित करून आक्रमक प्रहार करतात. वैभव या दुसऱ्या श्रेणीत येतो, जिथे तो पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत मोठी अडचण येत नाही, तोपर्यंत त्याच्या नैसर्गिक खेळण्याच्या दृष्टिकोनात मी कोणताही बदल करणार नाही.”
आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकण्याची मोठी संधी –
Vaibhav Sooryavanshi has a strong chance of making it to the playing XI in the 2nd T20I if Ishan Kishan misses out. 🤩💐 https://t.co/2HPhMN2Djg
— Professor X (@Rahul_Rahi_) October 23, 2026
इशान किशनच्या दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभवला भारताची निळी जर्सी घालून मैदानावर उतरण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर मिळालेला हा अनुभव त्याच्या कारकिर्दीसाठी अत्यंत मोलाचा ठरेल, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. क्राइस्टचर्चच्या वेगवान खेळपट्टीवर किवी गोलंदाजांच्या आव्हानाचा सामना हा युवा फलंदाज कसा करतो, याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.





