प्रभात वृत्तसेवा लाखणगाव – भारतीय संविधान जगात श्रेष्ठ असून ते प्रत्येक नागरिकाच्या घराघरात असणे आवश्यक आहे.संविधान हा राष्ट्रग्रंथ असल्याने त्याचा सन्मान आणि मूल्यांची जपणूक व्हावी. असे प्रतिपादन पूर्वा वळसे पाटील यांनी केले.लाखणगाव (ता.आंबेगाव) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक संविधान भवन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ग्रामपंचायत, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखणगाव यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. लाखणगाव येथील संविधान स्तंभ परिसर फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. विजयाच्या घोषणा देत रॅली स्तंभाजवळ पोहोचली. त्यानंतर संविधान स्तंभाला मानवंदना देऊन सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे,गौतमराव खरात, पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, मुख्याध्यापक अनिल देसले, शेतमाल प्रक्रियेचे अध्यक्ष सतीश रोडे, सरपंच प्राजक्ता रोडे,दस्तगीर मुजावर, दीपक वारे,गौतमराव रोकडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. व्याख्याते सुधाकर अभंग यांनी ‘संविधान जागृती’ या विषयावर व्याख्यान दिले. घोडेगाव येथे तहसील कार्यालयाच्या आवारात संविधान स्तंभ उभारावा, अशी मागणी स्मारक समितीचे अध्यक्ष गौतम खरात यांनी केली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन विठ्ठल टिंगरे यांनी केले.प्रकाश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तर, गौतम रोकडे यांनी आभार मानले.