Ambati Rayudu Troll : अंबाती रायुडू वादग्रस्त पोस्टमुळे होतोय ट्रोल, काय केली होती पोस्ट? जाणून घ्या

Ambati Rayudu troll after controversial post : सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती, त्यानंतर भारताने बदला घेतला आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूला सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे महागात पडले. ज्यामुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. त्याने काय पोस्ट केली होती? जाणून घेऊया.
अंबाती रायुडूने काय केली होती पोस्ट?
काल रात्री, पाकिस्तानने जम्मूच्या आसपासच्या अनेक शहरांमध्ये गोळीबार केला, ज्याला भारतानेही योग्य प्रत्युत्तर दिले. ९ मे रोजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “डोळ्याच्या बदल्यात डोळा घेतल्याने संपूर्ण जग आंधळे होते.” आपण लक्षात ठेवूया – हे कमकुवतपणाचे आवाहन नाही तर विवेकाची आठवण करून देणारे आहे. न्याय दृढ राहिला पाहिजे, परंतु मानवतेला कधीही विसरू नये. आपण आपल्या देशावर उत्कट प्रेम करू शकतो आणि तरीही आपल्या हृदयात करुणा बाळगू शकतो. देशभक्ती आणि शांती एकत्र राहू शकतात.
“An eye for an eye makes the whole world blind.”
Let’s remember — this isn’t a call for weakness, but a reminder of wisdom.
Justice must stand firm, but never lose sight of humanity.
We can love our nation fiercely and still hold compassion in our hearts.
Patriotism and peace can…— ATR (@RayuduAmbati) May 8, 2025
In moments like these, we stand united not in fear, but in resolve. I feel immense gratitude to our Indian Army who are the real heroes who carry the weight of a nation with unmatched courage, discipline, and selflessness🙏🏻
Your sacrifices don’t go unnoticed. Your bravery is what…— ATR (@RayuduAmbati) May 8, 2025
अंबाती रायुडूला चाहत्यांनी शिकवला चांगलाच धडा –
अंबाती रायुडूची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहते चांगलेच संतापले आहेत. चाहत्याने सोशल मीडियावरून अंबाती रायुडूवर जोरदार टीका करत त्याला चागला धडा शिकवला आहे. आता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अंबाती रायुडूचे सूर बदलले आहे. त्याने दुसऱी पोस्ट करुन भारतीय सैन्याचे खूप कौतुक केले आहे.
हेही वाचा – Arun Jaitley Stadium : दिल्ली स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी, डीडीसीएला धमकीचा ईमेल
अंबाती रायुडूने दुसऱ्या पोस्टमध्ये काय लिहिले?
I can’t even comprehend what our families at the borders are going through right now. I stand with my people and I empathise with the families at the borders. India stands united not in hate, but in unwavering belief that justice must prevail. We are a nation that cherishes…
— ATR (@RayuduAmbati) May 9, 2025
अंबाती रायुडूने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘सीमेवर आमची कुटुंबं सध्या काय अनुभवत आहेत, हे मला समजत नाही. मी माझ्या लोकांसोबत उभा आहे आणि सीमेवर राहणाऱ्या कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त करतो. भारत द्वेषाने नाही तर न्यायाचा विजय झाला पाहिजे या अढळ विश्वासाने एक आहे. आपण असे राष्ट्र आहोत, ज्यांना शांतता हवी आहे, पण आपल्या सुरक्षिततेची किंवा सन्मानाची किंमत देऊन नाही. हा क्षण आपल्याला केवळ न्यायाकडे घेऊन जावो असे नाही तर सीमेवर राहणाऱ्या आपल्या कुटुंबांचे हे दुःख लवकरच संपेल अशी आशा देखील बाळगो.’





