भाजपला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे – ममता बॅनर्जी

कोलकाता – जर कॉंग्रेसला हवी असेल तर भाजपाला पराभूत करण्यासाठी 2024 निवडणुकीत आघाडी होऊ शकते, असे संकेत प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी दिले.
जर कॉंग्रेसला हवे असेल तर आम्ही एकत्र लढू. लगेचच आक्रमक होण्याची गरज नाही. चार राज्यातील विजयाने भाजपाचे मोठे नुकसान होईल. भाजपला विरोधी करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. कॉंग्रेसने त्यांची विश्वासाहर्ता गमावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विसंबून राहता येत नाही, असे त्या म्हणाल्या.
चार राज्यात भाजपने विजय मिळवल्यानंतर तृणमूलने कॉंग्रेसला आघाडी करण्यासाठी आवाहन केले होते. या निवडणुकीत कॉंग्रेसची अक्षरश: वाताहात झाली. निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल भाजपाची हस्तक असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता. तृणमूलला जर खरोखरच भाजपाशी लढायचे असेल तर त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करावा असे कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी न्हणाले.





