Air India flight : इस्रायलला जाणारी एअर इंडियाचे सर्व उड्डाणे रद्द !

Air India flight – इस्रायल-हमास यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलमधील तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे 18 ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहे. यापूर्वी एअर इंडियाने (Air India flight) 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांची सर्व उड्डाणे रद्द केली होती.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, गरजेनुसार ते प्रवाशांसाठी त्यांचे चार्टड प्लेन वापरतील. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तेल अवीवसाठी दर आठवड्याला पाच उड्डाणे केली जातात.
ही सेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी असते. या दिवशी नवी दिल्ली ते इस्रायलची आर्थिक राजधानी असलेल्या तेल अवीवसाठी उड्डाण करतात.
दरम्यान, जे तिकीट्स 9 ऑक्टोबरपूर्वी काढण्यात आली होती आणि ज्यांची वैध्यता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे, अशी तिकीटे रद्द किंवा रीशेड्युल करण्यासाठी देखील एअर इंडियाकडून सूट देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.





