Alia Bhatt : वॅार 2 मध्ये आलिया भट? अभिनेत्रीची इन्स्टास्टोरी चर्चेत; कॅप्शनमध्ये दिली हिंट, काय म्हणाली पाहा….

Alia Bhatt : नुकताच बहुप्रतिक्षेत वॅार 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून अभिनेता हृतिक रोशन आणि साऊथ अभिनेता ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता बॅालिवूड अभिनेत्री आलिया भटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरच्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमुळे आलिया भट वॅार 2 चा भाग असणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री आलिया भटने तिच्या इंस्टाग्रामवरून एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने ‘वॉर 2’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘मजा, १४ तारखेला जवळच्या थिएटरमध्ये भेटू.’ या कॅप्शनमध्ये आलियाने मुख्य कलाकार हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर, कियारा अडवाणी आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनाही टॅग केले आहे. यामुळे आता आलिया वॅार 2 मध्ये पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आलिया भट ‘वॉर 2’ च्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये एका कॅमिओमध्ये दिसणार आहे, जो तिच्या आगामी स्पाय चित्रपट ‘अल्फा’ ची झलक असणार आहे. आलिया आणि शर्वरी यांचा आगामी अल्फा हा चित्रपट २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
वॅार 2 हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला असून, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या वॅार या चित्रपटाचा वॅार 2 हा सिक्वल आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १४ अॅागस्टला वॅार 2 रिलीज होणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असून, चित्रपटाच्या रिलीजसाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.





