Hritik Roshan | ‘वॉर 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिक रोशनला दुखापत

Hritik Roshan | बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय हृतिक त्याच्या डान्समुळे देखील ओळखला जातो. सध्या हृतिक त्याचा आगामी चित्रपट ‘वॉर 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग दरम्यान तो जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यानंतर चाहत्यांनी देखील त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘वॉर-2’ मधील एका गाण्याचं शूट करत असताना हृतिक रोशनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या कारणामुळे गाण्याचं शूटिंग थांबवण्यात आलं असून आता हे शूटिंग मे महिन्यात पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘वॉर 2’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ‘वॉर 2’मध्ये हृतिक रोशनसोबत साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर देखील पाहायला मिळणार आहे. चाहते हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरला एकाच पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वॉर 2’ चे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. Hritik Roshan |
‘वॉर 2’ हा सिद्धार्थ आनंदच्या ‘वॉर’चा सिक्वेल आहे. ‘वॉर’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरल होता, ज्याने रिलीजच्या एका आठवड्यात 200 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक होता. Hritik Roshan |
हेही वाचा:





