‘धडक 2’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; जात-पातच्या भिंती तोडणारी सिद्धांत-तृप्तीची प्रेमकहाणी

Dhadak 2 Trailer | अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या बहुप्रतिक्षीत ‘धडक 2’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ट्रेलरमध्ये सिद्धांत आणि तृप्ती यांच्यातील अफाट प्रेम आणि समाजाशी होणारी झुंज दिसून येते. ‘धडक 2’ चा ट्रेलर 3.04 मिनिटांचा असून, तो प्रचंड प्रभावी आहे. ट्रेलर पाहून अंगावर काटा येतो. यात दोघांचे कॉलेज लाईफ दाखवलं जातं जिथे निलेशवर (सिद्धांत) त्याच्या जातीच्या आधारावर अन्याय केला जातो.
तर दुसरीकडे विधी (तृप्ती) या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत केवळ नीलेशवर प्रेम करत राहते. ट्रेलरमध्ये निलेशवर होणारा अत्याचार, विधीने प्रेमासाठी केलेला संघर्ष, घर-समाजाकडून मिळणारा विरोध याची प्रभावी पद्धतीने मांडणी केल्याचे दिसते. यात ‘अॅनिमल’ फेम सौरभ सचदेवा, आशिष चौधरी, विपिन शर्मा आणि दीक्षा जोशी हे देखील झळकणार आहेत. Dhadak 2 Trailer |
करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत बनवलेला ‘धडक 2’ हा 2017 साली आलेल्या ‘धडक’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘धडक’ चे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले होते, तर ‘धडक 2’ चे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केले आहे. तब्बल 8 वर्षांनंतर प्रेक्षकांना या चित्रपटाचा पुढचा भाग पाहायला मिळणार आहे. ‘धडक 2’ हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. Dhadak 2 Trailer |
हेही वाचा:





