आलिया आणि शर्वरीच्या ‘अल्फा’ चित्रपटासाठी करावी लागणार प्रतिक्षा; रिलीज डेटमध्ये बदल

Alpha Release Date Postponed | बॉलीवुडमधील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘अल्फा’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या जोडीच्या दमदार अॅक्शन चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘अल्फा’ चित्रपट याआधी 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘अल्फा’ चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘अल्फा’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे. हा भारतातील पहिला महिला-प्रधान ॲक्शन चित्रपट असून ॲक्शन, स्पाय, थ्रिलरने भरलेला आहे. मात्र आता ‘अल्फा’ चित्रपट 17 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आहे. चित्रपटात उत्तम व्हीएफएक्स म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स पाहायला मिळणार आहे. ज्यासाठी प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाची रिलीज तारीख बदलण्याचे मुख्य कारण त्याचे व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) आहे. Alpha Release Date Postponed | Alpha Release Date Postponed |
IT’S OFFICIAL… ALIA BHATT – SHARVARI: YRF SHIFTS ‘ALPHA’ TO NEXT YEAR… #YRFSpyUniverse‘s first female-led spy film, #Alpha, will now release on 17 April 2026.
The post-production team needs additional time to complete the VFX, leading to the revised release date.… pic.twitter.com/2Ika67gqSX
— taran adarsh (@taran_adarsh) November 3, 2025
याबाबत चित्रपटाच्या प्रवक्त्यानी सांगितले की, “अल्फा हा आमच्यासाठी खास चित्रपट आहे. आम्ही तो सिनेमॅटिक स्वरूपात सादर करू इच्छितो. आम्हाला जाणवले की व्हीएफएक्सला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागेल. अल्फा हा सर्वांना आवडेल असा थिएटर अनुभव बनवण्यात आम्ही कोणतीही कसर सोडू इच्छितो. म्हणूनच, आम्ही आता 17 एप्रिल 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत.”
चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दोघांच्याही भूमिका अत्यंत प्रभावशाली आणि अॅक्शनने भरलेल्या असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. आलिया आणि शर्वरी यांना टक्कर देणारा सिक्वेन्स हा या प्रोजेक्टचा सर्वात मोठा वैशिष्ट्य मानले जात आहे. तसेच यात अनिल कपूर देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Alpha Release Date Postponed |
हेही वाचा :
“नावापुरतेच शहबाज सरकार अस्तित्वात, खरे नियंत्रण लष्कराकडेच” ; तालिबानकडून पाकिस्तानचा पर्दाफाश





