AUS vs ENG : जबरदस्त! कॅरीने झेल घेण्यासाठी लाबुशेनला दिली जोरदार धडक; थरारक झेलचा VIDEO व्हायरल

Carey Labuschagne Collision Catch Video Viral : अॅशेस २०२५-२६ मालिकेतील दुसरी कसोटी गाबा स्टेडियमवर ‘पिंक बॉल’ने खेळली जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ चेंडू आणि बॅट यांच्यातील रोमांचक संघर्षाने गाजला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ९ गडी गमावून ३२५ धावा केल्या होत्या. दरम्यान पहिल्या दिवशी यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने मागे धावत घेतलेला अप्रतिम झेल खूपच चर्चेत आहे,
कॅरी-लाबुशेनची टक्कर, तरीही पकडला झेल!
सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडने २६४ धावांवर असताना गस ॲटकिन्सनच्या रूपाने सहावी विकेट गमावली. ॲटकिन्सन मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागून वेगाने हवेत मागे गेला. यावेळी यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला मार्नस लाबुशेन या दोघांनीही झेल घेण्यासाठी मागे धाव घेतली आणि डायव्ह मारली.
View this post on Instagram
दरम्यान झेल पकडण्याच्या प्रयत्नात हे दोघेही आपसात जोरदार धडकले. पण, या धडकेनंतरही अलेक्स कॅरीने चेंडू व्यवस्थित पकडण्यात यश मिळवले आणि गस ॲटकिन्सनला ४ धावांवर माघारी परतावे लागले. हा थरारक झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिचेल स्टार्कने घेतल्या तब्बल ६ विकेट्स –
पर्थ कसोटीनंतर गाबा कसोटीतही मिचेल स्टार्कची गोलंदाजी कमालीची प्रभावी ठरली. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या ९ विकेट्स पाडण्यात त्याचा मोठा वाटा होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्टार्कने १९ षटके गोलंदाजी करत ७१ धावा देऊन ६ विकेट्स मिळवल्या होत्या.
हेही वाचा – Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत रचला नवा इतिहास
ज्यामुळे पिंक बॉल कसोटी क्रिकेटच्या इतिहासात स्टार्कने सहाव्यांदा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे १८ वे ५ विकेट्स हॉल आहे. यासह ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५ विकेट्स हॉल घेणाऱ्यांच्या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे.





