Akshay Kumar cast his vote: अक्षय कुमारनं बजावला मतदानाचा हक्क, मुंबईकरांना केलं मतदानाचं आवाहन

Akshay Kumar cast his vote: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमारनं गुरुवारी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला.
अक्षय कुमार आज सकाळी गांधी शिक्षण भवन येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचला. मतदान केल्यानंतर त्यानं मुंबईकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं. “आज बीएमसी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबईकर म्हणून आजच्या दिवशी रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतो. जर आपल्याला मुंबईचा खरा हिरो व्हायचं असेल, तर फक्त डायलॉगबाजी न करता मतदान केंद्रावर येऊन वोट केलच पाहिजे,” असं अक्षय कुमार म्हणाला.
VIDEO | Mumbai: On BMC polls, actor Akshay Kumar says, “Today is the BMC election and, as Mumbaikars, this is the day when we have the remote control. Therefore, all the people of Mumbai must come out and vote, rather than complaining later about things not being in good shape.… pic.twitter.com/CibMsSkTsC
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
अक्षय कुमारसोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नानंही मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर ट्विंकल खन्ना म्हणाली, “मतदान केल्यावर आपल्या हातात थोडं नियंत्रण आणि ताकद असल्यासारखं वाटतं. सवय आणि उद्याबद्दलची अपेक्षा या दोन्ही कारणांसाठी मी मतदान करते.”
View this post on Instagram
दरम्यान, मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारकडे एका लहान मुलीनं मदतीची मागणी केली. तिचे वडील कर्जात असल्याचं तिनं सांगितलं. सुरक्षारक्षकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षय कुमारनं तिला आपला मोबाईल नंबर देण्यास सांगितलं. त्या मुलीनं अक्षयच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला असता, त्यानं तिला थांबवलं.





