Nana Patekar: ‘सरकार, कशा आहात?’ नाना पाटेकरांच्या आठवणीत मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट
Nana Patekar: नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, त्यांच्या चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनीही भावुक पोस्ट शेअर केली आहे.
नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकर यांनी ‘नटसम्राट‘ या सिनेमात एकत्र काम केलेलं. सिनेमामध्ये नाना पाटेकर हे मेधा यांनी ‘सरकार‘ असं म्हणत असे. खऱ्या आयुष्यातही नाना मेधा यांना ‘सरकार‘ म्हणायचे. याचसंदर्भातील अनुभव सांगत मेधा यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मेधा मांजरेकर यांची पोस्ट
मेधा मांजरेकर यांनी नाना पाटेकरांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ते आमचे ‘नाना’ होते. ‘नटसम्राट’मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यांच्या सहवासातील तो अनुभव मी सदैव माझ्यासोबत जपून ठेवेन. नानांना अभिनय करताना पाहणे म्हणजे केवळ एका अभिनेत्याला पाहणे नसायचे, तर त्यातून तुम्हाला अभिनयाची कला, आयुष्य आणि माणसांबद्दल बरेच काही शिकायला मिळायचे.
View this post on Instagram
पण मला एक उत्तम अभिनेता लक्षात राहिलाच पण त्याचबरोबर एक खरा माणूसही लक्षात राहिला आहे. ते मला ‘सरकार’ म्हणायचे. जेव्हा जेव्हा त्यांचा फोन यायचा, तेव्हा ते म्हणायचे, ‘सरकार, कशा आहात?’ आणि ती केवळ एक औपचारिकता नसायची, त्यांना खरोखरच माझी विचारपूस करायची असायची. माझ्या कर्करोगाशी सुरू असलेल्या लढाईच्या काळातही नाना मला फोन करून माझी विचारपूस करायचे.
कोणतीही मोठी गोष्ट न करता, समोरच्याची काळजी घेण्याची त्यांची ती एक सुंदर पद्धत होती. त्यांनी मला 20 दिवसांपूर्वी फोन केलला होता आणि तेव्हाही, त्यांनी सर्वात आधी हेच विचारलं, ‘सरकार, कशा आहात?’ तेव्हा मला कल्पनाही नव्हती की ते शब्द शेवटचे ठरतील. लोक नानांना ‘नटसम्राट’ म्हणून लक्षात ठेवतील, एक असा असाधारण अभिनेता ज्याचा आवाज, ज्याची अभिनयातील तीव्रता आणि प्रत्येक पात्रात त्यांनी ओतलेली प्रामाणिकपणाची भावना अविस्मरणीय होती.
‘मलाही त्या सर्व गोष्टींची आठवण राहीलच. पण मला त्या माणसाचीही आठवण राहील, ज्यांनी फोन उचलून अत्यंत साधेपणानं आणि आपुलकीनं विचारलं होतं, ‘सरकार, कशा आहात?’ नाना, तुम्ही मला अशा आठवणी दिल्या आहेत ज्या मी आयुष्यभर जपून ठेवेन…तुम्ही सदैव आमचे ‘नटसम्राट’च राहाल. ओम शांती.’ असं मेधा मांजरेकर यांनी पोस्ट करत लिहिले आहे.
हेही वाचा:
Accident News : एस कॉर्नरवर काळाचा घाला; ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार





