अक्षय कुमार आणि सैफ अली खान १६ वर्षांनी पुन्हा एकत्र

Akshay Kumar | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल १६ वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत. प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘हैवान’ सिनेमात सैफ आणि अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे शूट सुरू झाले असून सध्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या हातात सिनेमाच्या नावाचा क्लॅपबोर्ड आहे. तर तो सैफ आणि प्रियदर्शनसोबत गप्पा मारताना आणि मस्ती करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिले की, “हम सब ही है थोडे से शैतान. कोई उपर संत, कोई अंदर से ‘हैवान’.माझा आवडता दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत आज हैवानचं शूट सुरु करत आहे. १८ वर्षांनंतर सैफसोबत काम करायला मिळतंय याचाही आनंद आहे. हैवानियत सुरु करु या.” या चित्रपटाबाबत अक्षय देखील उत्साहीत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सैफ आणि अक्षयने ‘मै खिलाडी तू अनाडी’,’तू चोर मै सिपाही’, ‘दिल्लगी’, ‘आरजू’ अशा काही सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. २००८ मध्ये दोघांनी ‘टशन’ सिनेमात एकत्र काम केले होते. यानंतर आता दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहे. पुन्हा एकदा सैफ आणि अक्षयला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दोघांची धमाल मस्ती या चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
दु:खद…! कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू अन् पत्नीचा रस्ते अपघातात मृत्यू, कारचा चक्काचूर





