Akhilesh Yadav : सर्वांत मोठा पक्ष युवाक्रांतीपुढे झुकला; अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपवर निशाणा साधला. जगातील सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपला युवाक्रांतीपुढे झुकणे भाग पडले, अशी टिप्पणी त्यांनी केली.

Akhilesh Yadav : कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपवर निशाणा साधला. जगातील सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपला युवाक्रांतीपुढे झुकणे भाग पडले, अशी टिप्पणी त्यांनी केली.
धर्मेंद्र प्रधान यांनी क्रांतीमुळे राजीनामा दिला. त्यासाठी विद्यार्थी आणि युवक अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, राजीनामा अतिशय उशीराने आला. केंद्र सरकारने आधीच चर्चाप्रक्रिया सुरू केली असती; तर देशभरात अनावश्यक तणाव निर्माण झाला नसता, असे अखिलेश (Akhilesh Yadav) आझमगढमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. केवळ मंत्र्याचा राजीनामा घेऊन मोठा पेच सुटणार नाही.
केंद्र सरकारने परीक्षा आणि भरती प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करायला हव्यात. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह सरकारकडे धरला, याकडेही त्यांनी (Akhilesh Yadav) लक्ष वेधले.
विरोधकांच्या पाठिंब्यामुळे एकप्रकारे सीजेपीच्या आंदोलनाला राजकीय बळ मिळाले. त्याशिवाय, समाजाचे विविध घटक पुढे सरसावल्याने त्या आंदोलनाची धग आणखीच वाढली.






