Akhilesh Yadav – एकीकडे पंतप्रधान लोकांना पेट्रोलियमवर कमी खर्च करण्यास सांगत आहेत. तर दुसरीकडे इंधन दरवाढही करत आहेत. आता पाच राज्यांमधल्या निवडणुका संपल्या असल्याने केंद्र सरकारने महागाईचे हत्यार उपसले आहे. इराण युद्ध तर दोन महिने सुरु आहे. मग आताच इंधन दरवाढ कशी केली, असा प्रश्न समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विचारला आहे. यादव यांनी इन्स्टाग्रामवर सायकल चालवतानाचे स्वतःचे एक स्केच पोस्ट केले आणि म्हटले, आम्ही आधीच म्हटले आहे की सायकलपेक्षा चांगले काहीही नाही. Akhilesh Yadav : “आम्ही आधीच म्हटले आहे की, सायकलपेक्षा चांगले काहीही नाही” – अखिलेश यादव इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत यादव यांनी दावा केला आहे की, यामुळे अपरिहार्यपणे महागाई वाढेल आणि आर्थिक विकासात घट होईल. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा मोदी सरकारने दिलासा देण्याऐवजी ग्राहकांना लुटले.