Agniveer Yojana: अखिलेश यादव म्हणतात, ‘आम्ही सत्तेवर येताच २४ तासांत अग्निवीर योजना बंद करू’

Akhilesh Yadav | Agniveer Yojana – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवृत्त अग्निवीरांसाठी राज्याच्या पोलिस दलात आरक्षण जाहीर केल्याच्या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले की,
आम्ही सत्तेवर येताच अग्निवीर योजना तातडीने रद्द करू. या योजनेतून भारतीय तरूणांची लष्कर भरतीची स्वप्ने दुरावली गेली असून लष्कराला देखील कमकुवत करण्याचे काम केले गेले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, यादव यांनी वारंवार आश्वासन दिले होते की जर समाजवादी पक्षाचा एक घटक असलेली इंडिया आघाडी सत्तेवर आली तर अल्पकालीन लष्करी भरती योजना रद्द करू.
आज एक्स वरील एका पोस्टमध्ये यादव म्हणाले, आम्ही सत्तेवर येताच, देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणारी आणि सैनिकांच्या भवितव्याशी खेळणारी अल्पकालीन ‘अग्नवीर’ लष्करी भरती २४ तासांच्या आत रद्द केली जाईल.केंद्र सरकारने पुर्वी प्रमाणेच लष्कर भरती योजना सुरू करावी अशी मागणीही त्यांनी केली.





