मायावती यांच्यावरील टीकेचा अखिलेश यांच्याकडून निषेध; नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपच्या एका आमदाराने बसपच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या टीकेचा निषेध समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केल्याची अनोखी घडामोड घडली. त्यामुळे उत्तरप्रदेशात नवी राजकीय समीकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमावेळी भाजपचे आमदार राजेश चौधरी यांनी मायावती यांच्यावर टीकेची झोड उठवली. मायावती चारवेळा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांना सर्वप्रथम भाजपने मुख्यमंत्री बनवले.
मात्र, आम्ही केलेली ती चूक होती. मायावती या उत्तरप्रदेशच्या सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री ठरल्या, असे ते म्हणाले. त्या टीकेचा समाचार अखिलेश यांनी सोशल मीडियावरून घेतला. राजकीय मतभेद असू शकतात.
पण, एक महिला म्हणून मायावती यांचा मानसन्मान कमी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांना भाजपने मुख्यमंत्री बनवल्याचे म्हणणेही लोकशाही देशात जनमताचा अपमान आहे.
त्याशिवाय, मायावती सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री ठरल्याची निराधार टिप्पणी अतिशय आक्षेपार्ह स्वरूपाची आहे. भाजप आमदाराच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल व्हायला हवा, अशी मागणी अखिलेश यांनी केली.
मायावती यांच्यावरील टीकेला अखिलेश यांनी प्रत्युत्तर देण्याची कृती अनेकांना चकित करणारी ठरली. त्यानंतर मायावती यांनी सोशल मीडियावरून व्यक्त होत.





