Gautam Gambhir : गंभीरशी वाद घालणाऱ्या क्युरेटरला आकाश चोप्राने पाडलं उघड, VIDEO शेअर करत बोलती केली बंद

Gautam Gambhir and Pitch Curator Controversy : ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाद उफाळला. भारतीय संघ पिचची पाहणी करत असताना चीफ क्यूरेटर ली फोर्टिस यांनी त्यांना पिचपासून दूर राहण्याची ताकीद दिली. यानंतर भारतीय संघाने स्पष्ट केले की, खेळाडूंनी स्पाइक्स न घालता जॉगर्स परिधान केले होते, त्यामुळे पिचचे नुकसान होण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही फोर्टिस ऐकण्यास तयार नव्हते. यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांना कडक शब्दांत समजावले.
नेमका काय होता वाद?
भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितले की, ग्राउंड स्टाफमधील एका कर्मचाऱ्याने भारतीय खेळाडूंना पिचपासून २.५ मीटर दूर राहण्यास आणि रश्शीच्या बाहेरून पिच पाहण्यास सांगितले. कोटक यांनी हे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले, पण भारतीय संघ याबाबत कोणतीही औपचारिक तक्रार करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
गंभीर यांनी फोर्टिसला ठणकावले –
🚨 Gautam Gambhir Fight with pitch curator 🚨
England have started playing dirty games. The Oval’s chief curator was trying to dictate terms to Indian Cricket Team on how they should practice and causing troubles during a practice session. pic.twitter.com/jBHhObVgNa pic.twitter.com/qjAGSNnpwK
— Jeet (@JeetN25) July 29, 2025
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गंभीर फोर्टिस यांना संतापाने म्हणताना दिसतात, “तुम्ही आम्हाला काय करायचे आणि काय नाही हे सांगू शकत नाही.” फोर्टिस यांनी तक्रार करण्याची धमकी दिल्यावर गंभीर यांनी ठणकावले, “जा, तक्रार करा, आम्हाला काही फरक पडत नाही.”
हेही वाचा – Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास! सामना न खेळताच बनला नंबर वन
आकाश चोप्रा यांनी उपस्थित केले सवाल –
Not letting Gautam Gambhir and co near the square at the Oval – Double standards much? 🤔 #Aakashvani #ENGvsIND pic.twitter.com/NALsH3y7Al
— Aakash Chopra (@cricketaakash) July 29, 2025
माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी २०२३ च्या अॅशेस मालिकेतील एक फोटो शेअर केली, ज्यामध्ये फोर्टिस इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅककुलम यांच्यासोबत सामन्याच्या ४८ तास आधी पिचवर उभे असल्याचे दिसतात. चोप्रा यांनी विचारले, “वेगवेगळ्या संघांसाठी वेगळे नियम का?” याशिवाय, गंभीर यांच्याशी भांडणानंतर काही वेळातच फोर्टिस आणि मॅककुलम रश्शीच्या आत गप्पा मारताना दिसले.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का! बेन स्टोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर, पाहा प्लेइंग इलेव्हन
सामन्यापूर्वी टीम इंडियाचे लक्ष विचलित करण्याचा डाव?
Curator Lee Fortis yelled at the support staff for keeping the cooling box on the square. Asked Indian coach Gambhir to stand behind the rope and check the pitch: India’s batting coach Sitanshu Kotak in the PC
Here’s the Match minus 2 photo of The Oval head curator Lee Fortis… pic.twitter.com/Z1p0oNwjTo
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) July 29, 2025
कोटक यांनी सांगितले की, भारतीय खेळाडूंनी स्पाइक्सऐवजी जॉगर्स घातले होते, त्यामुळे पिचला कोणताही धोका नव्हता. मात्र, या वादामुळे इंग्लिश माध्यमे भारतीय संघाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात, असे त्यांनी सूचित केले. हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला असून, यामुळे सामन्यापूर्वीच्या वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.





