Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून खासगी Bombardier Learjet 45 विमानाने (रजिस्ट्रेशन VT-SSK) बारामतीकडे निघाले होते. विमानाने सकाळी सुमारे ८:१० वाजता मुंबईतून उड्डाण केले आणि बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या अटेम्प्टमध्ये रनवेवरून बाजूला गेले, क्रॅश झाले. यानंतर भीषण स्फोटासह विमानाला आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, अपघाताच्या ठिकाणी अनेक स्फोट झाल्याचे साक्षीदारांनी सांगितले. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला, ज्यात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि दोन पायलट कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे. फडणवीसांसमोरील नवीन आव्हाने अजित पवार (Ajit Pawar) हे बेधडक स्वभावाचे आणि प्रशासनावर पकड असलेले नेते होते. महायुती सरकारमध्ये त्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वचक ठेवण्यासाठी अजित पवार यांच्यावर अवलंबून असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात होते. त्यांच्या निधनामुळे फडणवीस आणि भाजपाचा शिंदे गटावरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे. Ajit Pawar अजित पवार हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी मानले जात होते आणि महायुतीत राजकीय समतोल राखण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला होता. भाजपा १३२, शिंदे गट ५७ आणि अजित पवार गट ४१ जागा. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका घेतली होती, पण फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने शिंदे यांना बाजूला सारल्याचे समजत आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे भविष्य अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. दोन प्रमुख शक्यता वर्तवल्या जात आहेत: पहिली, विमान अपघातापूर्वीच पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. जर दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले तर सूत्रे शरद पवार यांच्या हाती येतील आणि ते महायुतीत सामील झाल्यास फडणवीस यांचे वर्चस्व कमी होऊ शकते. दुसरी, शरद पवार महाविकास आघाडीत राहिल्यास महायुतीत शिंदे यांचे महत्त्व वाढेल आणि फडणवीस यांना शिंदे गटाकडे दुर्लक्ष करणे कठीण जाईल. काही सूत्रांच्या मते, अजित पवार गट महायुतीत राहिल्यास शिंदे यांच्याकडे आणखी दुर्लक्ष होऊ शकते. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलाकडे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे विकासाचे कार्य, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासकीय कौशल्य कायम स्मरणात राहील. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) आणि DGCA ने तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कमी दृश्यमानता आणि दुसरा लँडिंग प्रयत्न यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे पण वाचा : Ajit Pawar : आई दादांसाठी नाश्ता करत होती, अचानक बातमी झळकली अन्….; फार्म हाऊसवर मन सुन्न करणारा प्रसंग, VIDEO पाहा