Ajit Pawar: ‘गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो…’; ‘गुलाबी कॅम्पेन’वरून अजित पवारांवर हल्लाबोल, ट्विट चर्चेत !

Ajit Pawar | Pink Jacket । Anjali Damania: लोकसभा निवडणुकीत फक्त एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
या सगळ्यात घडामोडी सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. त्यासाठी त्यांनी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. एवढंच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते.
याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केलीय. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसते. दरम्यान, आता गुलाबी कॅम्पेनवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो.
त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या काराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार ना कारणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही.
केवळ गुलाबी जैकेट घालून वल्याचा वाल्मिकी होत… pic.twitter.com/tRa4fBI6pF
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 8, 2024
त्या म्हणाल्या की, “गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या काराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार ना कारणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो’. या आशयाचे ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
गुलाबी जॅकेटवर खुद्द अजित पवार काय म्हणतात पाहा…..
नेमकं या गुलाबी रंगा मागचं रहस्य काय? हे आता स्वतः अजित पवार यांनी उघडं केलं आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच, दि. 20 जुलै रोजी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना गुलाबी रंगाचं जॅकेट का परिधान केलं? असा सवाल विचारण्यात आला असता,
ते म्हणाले की, ‘तुला काही त्रास होतोय.. मला व्यक्ती स्वातंत्र आहे. मला काय घालायचं त्याचा मला अधिकार नाही का? मी माझ्या पैशानी घालतो.. तुमच्या पैशांनी घालतो का? जे कॉमन मॅन घालतो तेच मी घालतो.. मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे योग्य वाटतं तेच मी करतो, असं अजित पवार म्हणाले.





