Ajit Pawar | Pink Jacket: लोकसभा निवडणुकीत फक्त एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
या सगळ्यात घडामोडी सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. त्यासाठी त्यांनी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. एवढंच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते.
याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केलीय. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. यावरच आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं या गुलाबी रंगा मागचं रहस्य काय? हे आता स्वतः अजित पवार यांनी उघडं केलं आहे. आज (दि. 20 जुलै) माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना गुलाबी रंगाचं जॅकेट का परिधान केलं? असा सवाल विचारण्यात आला असता, ते म्हणाले की, ‘तुला काही त्रास होतोय.. मला व्यक्ती स्वातंत्र आहे. मला काय घालायचं त्याचा मला अधिकार नाही का?
मी माझ्या पैशानी घालतो.. तुमच्या पैशांनी घालतो का? जे कॉमन मॅन घालतो तेच मी घालतो.. मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे योग्य वाटतं तेच मी करतो, असं अजित पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?
या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
कधीपासून लागू होणार ही योजना?
महाराष्ट्र सरकारने मुली आणि महिलांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील. ही योजना येत्या जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.
२ लाख मुलींना लाभ मिळणार
राज्यातील ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ज्या मुली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील, त्यांचे फी माफ करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले. या योजनेंतर्गत दरवर्षी २ लाख मुलींना लाभ देण्याची योजना आहे. यासाठी दरवर्षी २ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.