नवी दिल्ली – अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये यंदा कॉंग्रेस,आप आणि भाजप अशी टक्कर पाहायला मिळाली. भाजपने देखील निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये महत्वाचे बदल केले होते. त्याअनुषंगाने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय आहे. गुजरातमध्ये बहुमतासाठी 92 जागा जिंकणे आवश्यक आहे.
सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपा १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाला कॉंग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. सध्या भाजपा 123, कॉंग्रेस 22 आणि आप 10 जागांवर आघाडीवर आहे.
Gujarat | Celebrations at ‘Shri Kamalam’, the BJP office in Gandhinagar, as trends indicate the party’s clear lead in the State elections
BJP-144, Congress-20, AAP-6 & Others-5, as per ECI trends. pic.twitter.com/rMv0WGlBcc
— ANI (@ANI) December 8, 2022
एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाला 182 जागांपैकी 117 ते 151 जागा आणि कॉंग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. आपला मात्र तीन ते 13 जागांवर समाधान मानावे लागेल, असे अंदाज आहेत.गुजरात भाजप कार्यकर्त्यांनी जोल्लोषाला सुरुवात केली असून भाजपने ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.