Ajit Pawar Live News : अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले

मुंबई – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. आज दुपारीच काही वेळापूर्व राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आता महाराष्ट्रला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे.
#LIVE | #राजभवन | शपथविधी सोहळाhttps://t.co/rPI5b2kEaO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2023





