Ajay Devgan and Siddharth Malhotra | बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. २०१२ मध्ये ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर आता पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतीच ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. विजय कुमार अरोरा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अजय देवगनसोबत मृणाल ठाकूर, संजय दत्त आणि रवी किशन दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. Ajay Devgan and Siddharth Malhotra |
अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर
अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. सिद्धार्थचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट २५ जुलैला प्रदर्शित होत आहे. म्हणजे या दोन्ही कलाकारांच्या चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. ‘परम सुंदरी’मध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तुषार जलोटा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. आता या टक्करमध्ये बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल. Ajay Devgan and Siddharth Malhotra |
परंतु, ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाच्या पहिल्या भागात मृणाल ठाकूरच्या जागी सोनाक्षी सिन्हा होती, मात्र यावेळी ती या चित्रपटाचा भाग नसणार आहे. या चित्रपटाने जगभरात 135.12 कोटी रुपयांची कमाई केली होती. Ajay Devgan and Siddharth Malhotra |
‘सन ऑफ सरदार 2’ व्यतिरिक्त अजय देवगन 2025 मध्ये आणखी काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा ‘आझाद’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगनचा पुतण्या अमन देवगन डेब्यू करत आहेत. त्याचबरोबर अजय ‘रेड 2’ आणि ‘दे दे प्यार दे दे 2’ मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा: