कान्सचं रेड कार्पेट ऐश्वर्याने गाजवलं…बनारसी ब्रोकेड केप लुक समोर; ‘त्या’ संस्कृत श्लोकाने वेधले लक्ष

Aishwarya Rai Bachchan Cannes ; बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ७८ व्या कान्स फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाली असून तिने वेअर केलेल्या दुसऱ्या ड्रेसनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री करताच पहिल्या दिवशी पांढऱ्या साडीने केसांमध्ये सिंदूर या लूकनें सर्वांची मनं जिंकली होती. आता तिचा कान्समधला दुसरा लूकही अद्भुत असून तिने पुन्हा एकदा सर्वांना घायाळ केले आहे. मात्र, तिने वेअर केलेल्या ड्रेसच्या केपवर संस्कृत श्लोक लिहिला आहे. याचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्याच्या दुसऱ्याने लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिने ब्लॅक गाऊनसोबत बनारसी ब्रोकेड केप घातली होती. तिचा केप खूप खास होता आणि त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कान्समधील तिच्या दुसऱ्या लूकसाठी गौरव गुप्ताने डिझाइन केलेला खास पोशाख परिधान केला होता. तिने ब्लॅक रंगाचा सिक्वीन असलेला स्ट्रॅपलेस गाऊन घातला होता आणि तो सिल्व्हर बनारसी ब्रोकेड केपसोबत घातला होता. या केपसह, ऐश्वर्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय संस्कृतीची झलक दाखवून दिली आहे.
View this post on Instagram
तिच्या केपवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिला असून, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफलहेतुर्भूर्म ते संगोस्तवकर्मणि’. असे लिहिले आहे. याबाबत इंस्टाग्राम पोस्टमध्ये हाताने विणलेल्या बनारसी ब्रोकेड केपवर पवित्र भगवद्गीतेतील एक संस्कृत श्लोक कोरलेला आहे, असा खुलासा डिझायनर गौरव गुप्ता यांनी स्वतः केला आहे. ऐश्वर्याचा गाऊन हाताने भरतकाम केलेला असून त्यावर सोने, चांदी, कोळसा आणि मायक्रो ग्लास क्रिस्टल्स वापरण्यात आले आहेत.





