आता भट नाही तर कपूर म्हणायचं! आलियाने आडनाव बदललं? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Alia Bhatt : ३ वर्षांपूर्वी आलिया आणि रणबीर हे दोघेही विवाहबंधनात अडकले. या दोघांना बॅालीवडूचे क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी नेहमी शेअर करत असतात. नुकताच आलिया भटचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आलियाने आडनाव बदल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आलियाने रणबीर कपूरशी लग्न केले, परंतु तिने लग्नानंतर तिचे आडनाव बदलले नाही. पण नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलियाच्या नावासमोर कपूर लिहिलेले दिसत आहे. यावरून चाहते असा अंदाज लावत आहेत की, आलियाने अधिकृतपणे तिच्या नावापुढे कपूर जोडले आहे. मात्र, याबाबत आलियाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
खरंतर, काही दिवसांपूर्वी आलियाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान तिचा तयारी करतानाचा एक व्हिडिओ आहे, जो तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. आता या व्हिडिओमधील एक क्लिप खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये आलिया कपूर ज्या ठिकाणी बसलेली आहे, त्या खोलीतील एलसीडीवर आलिया कपूर असे लिहिलेले दिसत आहे. यामुळे तिच्या आडनाव बदलल्याची जोरदार चर्चा होत आहे.
२०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केले. रिया नावाची त्यांना एक गोंडस मुलगी आहे. आलियाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या जिगरा या चित्रपटात दिसली होती. आता ती यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या बहुप्रतिक्षित गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.





