Politics News : मोठी घडामोड..! भाजपच्या मित्रपक्षात उभी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड?
Politics News : भाजपचा मित्रपक्ष असलेल्या AIADMK मध्ये सी. व्ही. षणमुगम यांनी ३६ आमदारांसह बंड केले आहे.

Politics News : तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अण्णा द्रमुकमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाचे माजी मंत्री सी. व्ही. षणमुगम यांनी पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या विरोधात थेट बंड पुकारले असून तब्बल ३६ नवनिर्वाचित आमदार त्यांच्या गटात असल्याचा दावा केला जात आहे. (Politics News)
विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर पक्षात नाराजी वाढली होती. अण्णा द्रमुकने भाजप आणि एनडीए आघाडीसोबत निवडणूक लढवली होती. मात्र पक्षाला फक्त ४७ जागांवर विजय मिळाला, तर संपूर्ण युतीला ५३ जागा मिळाल्या. या पराभवानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Politics News)
सी. व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखालील गटाने पलानीस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ईपीएस पक्षाच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निर्णय घेत आहेत,” असा आरोप बंडखोर गटातील नेत्यांनी केला आहे. यामुळे पक्षात दोन गट पडण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. (Politics News)
TVK सोबत जाणार?
तमिळनाडूमध्ये सध्या त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्तास्थापनेसाठी विविध राजकीय हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, षणमुगम गट अभिनेता विजय यांच्या TVK पक्षासोबत जाण्याच्या शक्यताही तपासत आहे. दुसरीकडे पलानीस्वामी हे डीएमकेकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Politics News)
रिसॉर्ट पॉलिटिक्सला वेग
पुडुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये काही आमदारांची बैठक झाल्यानंतर तमिळनाडूतील राजकीय घडामोडींना वेग आला. त्यानंतर पलानीस्वामी यांनी सोशल मीडियावर सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाचे अभिनंदन करणारी पोस्ट केली. यानंतर त्यांच्या डीएमकेशी संपर्काच्या चर्चांना अधिक उधाण आले. (Politics News)
दरम्यान, लगेचच सी. व्ही. षणमुगम यांच्या निवासस्थानी ३५ आमदारांची बैठक पार पडली. विश्वासदर्शक ठरावावेळी हे आमदार विजय यांच्या TVK पक्षाला पाठिंबा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Politics News)
मतदारांशी विश्वासघात
षणमुगम यांनी पलानीस्वामी यांच्यावर मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. “पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्यानंतरही सत्ता मिळवण्यासाठी ईपीएस यांनी गुप्त हालचाली सुरू ठेवल्या,” असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.
सध्या अण्णा द्रमुकमधील वरिष्ठ नेते दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असले तरी परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. (Politics News)





