अहमदनगर : तरुणाईला लागली गांजा व्यसनाची भुरळ!

गांजा अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकण्याची मागणी
नेवासा (राजेंद्र वाघमारे) : हल्लीच्या युगात तरुणाईला गांजा ओढण्याची भुरळ लागल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबतच आता अनेक अल्पवयीन मुले गांजा ओढण्याच्या व्यसनात अडकत चालेल आहेत. त्यामुळे पुढची पिढी बरबाद होण्याची धोक्याची घंटा निर्माण झालेली आहे. पोलीसांनी दक्ष राहून अशा मुलांना ब्यात घेवून खाकीचा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.
हल्लीच्या युगातील तरुणाईला गांजाच्या व्यसनांनी घेरलेले असून अल्पवयीन मुलांसह युवकांकडून सर्वाधिक गांजा ओढण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलांमध्ये प्रचंड नैराश्य येत असून नैराश्याच्या भरात त्यांच्याकडून अनेक अनुचित प्रकार घडले जात आहेत.असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलांमध्ये प्रचंड नैराश्य येत असून नैराश्याच्या भरात त्यांच्याकडून अनेक अनुचित प्रकार घडले जात आहेत. या व्यसनाधिन तरुणाईला बाहेर काढण्यासाठी त्यांना समुपदेशन करणे अत्यंत काळाची गरज बनली असल्यामुळे हा एकमेव पर्याय व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांसाठी उरलेला आहे त्यासाठी आता तरुणाईला व्यसनाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रबोधनही काळाजी गरज बनली असून त्यामुळे सामाजिक व व्यसनमुक्ती चळवळ राबविणे गरजेचे बनले आहे.
गांजा ओढल्यामुळे तरुणाईला भूक न लागणे मेंदूची चालना कमी होणे,नैराश्यामध्ये जाणे,समोरच्या सोबत अडखळून बोलणे,नेहमी विसरून जाणे ही लक्षणे गांजा ओढण्यामुळे होत असल्याचे दिसून येते तसेच मुलांना जडलेल्या व्यसनामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार होणे महत्त्वाचे असून त्याला मानसिकरित्या समुपदेशन होणे देखील काळाची गरज आहे.
नशेमुळे नैराश्याचे प्रकार
गांजा ओढण्याचे व्यसन अनेक अल्पवयीन तरुणांसह युवक हे मानसिक दृष्ट्या कमकुवत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांना आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याचे कोणत्याच प्रकारचे भान नसून ते स्वत:मध्ये गुरफटून गेलेले दिसतात.तसेच नशा केल्यानंतर समोरच्यासोबत अडखळून बोलणे,विसरून जाणे,भूक न लागणे असे त्याची लक्षणे असून ते मानसिक दृष्ट्या कमकुवत होऊन जात असल्याचे बोलले जात आहे.
गांजा ओढण्याच्या व्यसनापायी तरुणाईमध्ये जणूकाही मोठी स्पर्धाच लागलेली असून सांयकाळच्या वेळेत अनेक निर्जळस्थळी अंधाराचा फायदा उठवत तरुणाईचे थवे जमा होवून गांजा फुकतांना दिसत असून बिघडलेल्या तरुणाईला पालकांनी सुधारण्यासाठी लक्ष्य घालण्याबरोबरच पोलीसांनी आम्ली तस्करी रोखवून बिघडत चाललेल्या तरुणाईला सरळ करण्यासाठी गांजा अड्ड्यावर छापा घालण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.





