MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली; शरद पवार गटाकडून ‘हा’ तगडा उमेदवार रिंगणात उतरणार
MLC Election : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता राजकीय घडामोडींनी उच्चांक गाठला आहे.

MLC Election : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (MLC Election)
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीत राणी लंके यांच्या उमेदवारीमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार निलेश लंके या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार आणि त्यांची रणनीती काय असणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. (MLC Election)
काँग्रेसकडूनही दोन नावांची चर्चा
महाविकास आघाडीतील काँग्रेसकडूनही हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दीप चव्हाण आणि करण ससाने यांची नावे उमेदवारीसाठी पुढे केली आहेत. दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. (MLC Election)
यामुळे महाविकास आघाडीतून अखेर अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. राणी लंके, दीप चव्हाण आणि करण ससाने यांच्यापैकी कोणाला अंतिम संधी मिळणार, की शेवटच्या क्षणी वेगळेच राजकीय समीकरण तयार होणार, याची चर्चा सुरू आहे. (MLC Election)
लंके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
राणी लंके यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत कोणत्याही पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. (MLC Election)





