Sharad Pawar : मोठी बातमी..! शरद पवार सत्तेत सहभागी होणार? ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ
Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना वेग आला आहे.

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. ()
अशातच आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी वेग आला आहे. शरद पवार 15 डिसेंबरनंतर राज्याच्या सत्तेत सहभागी झालेले दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. (Sharad Pawar)
बच्चू कडूंनी नेमकं काय म्हटलं?
आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना 15 डिसेंबरनंतर ते राज्याच्या सत्तेत दिसतील, असे भाकीत केले. विशेष म्हणजे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. कडू यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार यांचा पक्ष सत्ताधारी पक्षांसोबत जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Sharad Pawar)
डिलिमिटेशन विधेयकामुळे चर्चांना उधाण
डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने घेतलेल्या भूमिकेनंतर राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या विधेयकाला दिलेला पाठिंबा आणि राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय या दोन स्वतंत्र बाबी आहेत. तरीही सध्याच्या राजकीय परिस्थितीत या घटनांची सांगड घातली जात आहे. (Sharad Pawar)
15 डिसेंबरनंतर काय घडणार?
बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्यामुळे आता 15 डिसेंबर या तारखेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी होणार का, त्यासाठी कोणती राजकीय समीकरणे तयार होणार आणि या दाव्यावर पवार यांची काय प्रतिक्रिया येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Sharad Pawar)
Sharad Pawar : शरद पवार देशाच्या हिताचा विचार करत नाहीत; ‘या’ बड्या नेत्याची टीका





