Agrisena Chief Death : महाराष्ट्रात न्याय हक्कासाठी लढणारा झुंजार नेता हरपला; आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते राजाराम साळवी यांचे निधन
Agrisena Chief Death : महाराष्ट्र राज्य आगरीसेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांचे शनिवारी (६ जून २०२६) सायंकाळी वृद्धत्वामुळे निधन झाले.

Agrisena Chief Death : महाराष्ट्र राज्य आगरीसेनेचे प्रमुख आणि आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते राजाराम साळवी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसी आणि आगरी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे नेतृत्व हरपल्याने ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण समाजात शोककळा पसरली आहे. (Agrisena Chief Death)
ठाण्यातील कळवा येथील मनीषानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरीसेनेची स्थापना केली होती. आगरीसेनेच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने उभारली. ओबीसी आणि आगरी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. (Agrisena Chief Death)
कामगार चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिले. शहाड येथील सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक उद्योगांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत होत्या. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. कळव्यातील मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. (Agrisena Chief Death)
राजाराम साळवी यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये काम करत राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही भूषवले होते. समाजकारण आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. (Agrisena Chief Death)
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कळव्यातील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Agrisena Chief Death)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार Suresh Mhatre यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत राजाराम साळवी यांच्या निधनाला आगरी समाजासाठी मोठी हानी असल्याचे म्हटले आहे. समाजहितासाठी अखंड कार्य करणारे आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Agrisena Chief Death)
राजाराम साळवी यांच्या निधनामुळे आगरी समाजातील एक संघर्षशील, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. (Agrisena Chief Death)





