पुण्यातील हरिटेज इमारतीतील सहाव्या मजल्यावर कृषीमंत्र्यांनी….; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा मोठा दावा, काय म्हणाले पहा…
Updated On:

Prashant Jagtap | Manikrao Kokate | कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून १९९६ साली सदनिका आपल्या नावे करून घेतल्याचे प्रकरणी त्यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली. मात्र, पुढच्या काही दिवसात त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. यामुळे कोकाटे यांना दिलासा मिळाला. मात्र, शरद पवार गटाचे पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर एक मोठा दावा केला आहे.
पुण्यातील एका वास्तूची नोंद हेरिटेज वास्तू म्हणून आहे, त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोकाटे यांनी स्वतःचे कार्यालय थाटण्याकरिता त्या मजल्याची तोडफोड केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे चालू असल्याचे देखील जगताप म्हणाले आहेत. याविषयी त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून व्डिडिओ शेअर करत माहिती दिली.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंत्र्यांच्या सुरस कहाण्या बाहेर येत आहेत. आता अलिकडच्या काळामध्ये ज्या कृषिमंत्र्यांनी गरिबांचे फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने त्यांना शिक्षा दिली. मात्र, वरच्या कोर्टाच्या स्थगितीमुळे आज त्यांच मंत्री पद टिकलेले आहे. त्यांनी पुन्हा एकदा एक वेगळा प्रकारचा उद्योग केला आहे. कृषी खात्याच्या जमिनीत एकूणच कृषी महाविद्यालयासाठी ज्या जागा रिझर्व आहेत. त्याच्यामध्ये केलेला आहे. पुण्यातील एका वास्तूची नोंद हेरिटेज वास्तू म्हणून आहे. त्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर या बहाद्दरांनी स्वःताचे कार्यलाय थाटण्याकरिता इमारतीतील मजला तोडण्याचे कामकाज केले आहे, असा दावा जगताप यांनी केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
न्यायालयात जाणार
या मंत्र्याच्या कृत्यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आलं. यांच्या नंतरही त्यांनी कोणत्याही प्रकाराचा त्यांनी बोध घेतलेला नाही. महाराष्ट्र शासनाने त्यांना मंत्र्यालयात दालन दिलेले असताना कृषी विभागाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्या ठिकाणी त्यांना कार्यालय असताना सुद्धा नव्याने पंचतांराकितं कार्यालय करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या हेरिटेज इमारतीचा बळी दिला जात असल्याचे म्हणत आता आम्ही उच्च आणि सर्वेाच्च न्यायालयात जाणार असल्याचे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
आता तरी आवरा…
फडणवीस यांनी कोर्टाच्या आदेशानंतही त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यांना नवेनवे उद्योग करायला मुभा दिली जाते. या मंत्र्याला आता तरी आवरा अशी मागणी पुण्याच्या जनतेच्या वतीने करतो. किमान हेरिटेजच्या बाबबती ज्या काही चुका असतील त्याबद्दल काय करणार आहात असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे.
देवेंद्रजी फडणवीस… आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा !
गरिबांचे फ्लॅट्स हडपूनही मंत्री पदाला चिकटून असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नवीन प्रताप आज उघडकीस आला. या मंत्रिमहोदयांना मुंबईतील मंत्रालयात प्रशस्त दालन आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी खात्याचे कार्यालय… pic.twitter.com/f5SKKJ4Lzn
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 24, 2025





