nagar | अगस्तीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

अकोले, (प्रतिनिधी)- अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कॉम्पुटरअँप्लिकेशन अँड रिसर्चच्या एमसीए विभागातील विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली.
नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा निकालात एमसीए विभागातील द्वितीय वर्षामध्ये सुप्रिया गोविंद सावंत हिने 81.36 % मिळून प्रथम तर पूजा सुरेश हासे हिने 74.79 % मिळून दुसरा तर भोर शुभांगी नवनाथ हिने 73.36 % मिळून तिसरा क्रमांक मिळविला आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय नेहमी आघाडीवर असते आणि त्याचेच हे फलित आहे, असे गौरवोद्गार काढत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. प्रशांत तांबे, एमबीएचे विभागप्रमुख प्रा. गोपाल बुब, एमसीएचे विभाग प्रमुख प्रा. अमोल नवले, परीक्षा विभागप्रमुख प्रा. सुयोग गजे तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





