Akole Accident : शाळकरी मुलाला चिरडले! लक्झरी मालकाची उद्दाम भाषा, पण खाकीने जिंकलं मन
Akole Accident : पर्यटकांच्या बसने विद्यार्थ्याला चिरडल्यानंतर मालकाची पोलिसांनाच धमकी; मदतीऐवजी दाखवला वशिल्याचा माज.
Updated On:

Akole Accident : अकोले तालुक्यातील वारंघुशी फाट्याजवळ अजित साहेबराव पंडित या शाळकरी विद्यार्थ्याला पर्यटकांच्या एका लक्झरी बसने चिरडले. सदर अपघात हा अतिशय भयंकर स्वरूपाचा होता. त्यामुळे रुग्णाला तत्काळ नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याला उपचारांबरोबरच शेंडी ग्रामस्थही मदतीसाठी धावले. राजूर पोलिसांनी लक्झरीच्या मालकाला फोन लावत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
मात्र, निर्दयी मालकाला या अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची कोणतीही दया आली नाही. त्याने हात वर करत उलट त्याने पोलिसांनाच धमकी देत आपण वशिल्याचे माणूस असल्याचे सांगितले. शेवटी सर्वच प्रयत्न हतबल ठरायला लागले. विद्यार्थ्यांचे प्राण वाचविणे गरजेचे होते. राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तत्काळ या विद्यार्थ्याच्या पालकांच्या खात्यावर दहा हजार रुपयाची मदत पाठविली.
शेंडी येथील माजी पं. स. सदस्य दिलीप भांगरे यांनीही शेंडीच्या व्यापाऱ्यांना एकत्र करत निधी जमवला. तो विद्यार्थ्याच्या पालकांना सोपविण्यात आला. राजूर पोलिसांनी दाखविलेल्या या मदतीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.




