‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर सिंगला लागली लॉटरी; साऊथ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन

Ranveer Singh | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ सिनेमा यशाच्या शिखरावर आहे. ह्या चित्रपटाला रिलीज होऊन एक महिना पूर्ण झाला असून, आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयासह त्याच्या लुकने सर्वांची मनं जिंकली. या चित्रपटाच्या यशानंतर आता रणवीरला आणखी एका चित्रपटाची लॉटरी लागली आहे.
‘धुरंधर’नंतर रणवीर सिंग लवकरच चित्रपट ‘प्रलय’ या आगामी थ्रिलरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत ३२ वर्षीय सुंदर साऊथ इंडियन अभिनेत्री दिसणार आहे. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री लोका-चॅप्टर चंद्र फेम कल्याणी प्रियदर्शन त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमातून कल्याणी प्रियदर्शन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. तिला हंसल मेहता यांच्या मुलगा जय मेहता दिग्दर्शित झॉम्बी थ्रिलर ‘प्रलय’मध्ये रणवीर सिंगसोबत कास्ट करण्यात आले आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रलय’ मोठ्या बजेटवर बनणारा चित्रपट आहे, ज्यात जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्सवर विशेष लक्ष दिले गेले आहे. कल्याणी बहुतांश मल्याळम चित्रपटांचाच भाग राहिली असून तिच्यासाठी याद्वारे यश मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. दरम्यान, चित्रपट निर्माते एप्रिल २०२६ मध्ये ‘प्रलय’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे. ३० दिवसांच्या आतच या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ७७२.२५ कोटी रुपये कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक ‘धुरंधर २’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा:
“भारताला माहिती आहे की तो…” ; सिंधू करारावरून ४ दिवसांत पाकिस्तानची तिसरी धमकी





