रणवीर सिंगच्या ‘डॉन-३’ चित्रपटाची अपडेट समोर; ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Don 3 Film | अभिनेता रणवीर सिंगच्या ‘डॉन-३’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवी अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची माहिती आता समोर आली आहे.
‘डॉन-३’ मध्ये सर्वांत पहिल्यांदा रणवीर सिंगची अभिनेत्री म्हणून कियारा आडवाणी हिच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. पण, कियारा गर्भवती राहिल्यानं तिनं हा ‘डॉन 3’ चित्रपट सोडला. कियारानंतर मराठमोळ्या शर्वरी वाघच्या नावावर चर्चा सुरू होती.
&
View this post on Instagram
;
क्रिती सेनॉनची ‘डॉन-३’मध्ये एन्ट्री
पण, पिंकव्हिलानुसार आता शर्वरी वाघ नाही तर क्रिती सेनॉनची ‘डॉन-३’मध्ये एन्ट्री केली आहे. फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटची क्रिएटिव्ह टीमचा ‘डॉन 3’ मध्ये एका अनुभवी अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार होता. त्यानुसार आता या चित्रपटात ती रोमा ही भूमिका साकारताना दिसू शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Don 3 Film |
या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. त्यानंतर पुढील वर्षी ख्रिसमस 2026 पर्यंत डॉनचा तिसरा भाग प्रदर्शित होऊ शकतो. Don 3 Film |
हेही वाचा:
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्यावर ईडीची मोठी कारवाई ; दिल्ली-नोएडासह १० ठिकाणी छापे





